Goodbye 2020..
Goodbye 2020 .. गुडबाय २०२०.. कित्ती सोप्पं असतं ना, एखाद्या वर्षाला गुडबाय म्हणणं.. तसं म्हणावं तर लागणारंच. कारण, आपण सर्वजण पुढच्या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कदाचित, हे पुढचे नवीन वर्ष आपल्याला खूप काही देऊन जाईल आणि हे तरी वर्ष चांगलं असेल, या आशेने आपण पुढच्या वर्षात प्रवेश करतो खरं.. परंतु, तेही वर्ष आपल्या मनासारखं गेलं नाही की, पुन्हा त्या वर्षाला वाईट म्हणून बसतो. मग पुन्हा पुढच्या नवीन वर्षाचे वेध लागतात. असे चक्र दरवर्षी चालूच असते. या २०२० च्या सुरुवातीलाच सर्व काही सुरळीतपणे चालू होते. मग नंतर कोण जाणे? कुठला व्हायरस आला आणि सर्वच बिघडू लागले. लोकं आजारी पडली. याचा इलाज नसल्यामुळे कितीतरी नुकसान झाले. परिणामी, देशात लॉकडाऊन करावे लागले. याबद्दल, लोकांच्या मनात दहशती निर्माण झाल्या की, आता काय होणार? पूर्ण वर्ष बर्बाद होणार.. शाळा, कॉलेज, नोकऱ्या, कामधंदे यांना तात्पुरते बंद करण्यात आले. यातंच लोकं चिंतीत झाले. लोकांचे बाहेर पडणे, एकत्र येणे देखील बंद झाले. परंतु, त्यातही उगीच बाहेर फिरणाऱ्या लोका...