जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत, जो जगातील सर्वात सुंदर देश आहे. हा देश इतका स्वच्छताप्रिय आहे की, कोणीही आश्चर्यचकित होईल. जेथे आश्चर्यकारक गोष्टीही अनेक आहेत. आपण जाणून घेत आहोत, आशियातील सर्वात विकसित देश म्हणजेच, 'सिंगापूर' बद्दल... सोबतच, आपण हे देखील जाणून घेणार आहोत की, या देशातील फिरण्याची प्रसिद्ध ठिकाणे, प्रसिद्ध खाद्य-पदार्थ तसेच, या देशाबद्दलच्या अशाच अनेक रोचक गोष्टी. ● प्रस्तावना (Introduction)- 'सिंगापूर' हा देश जगातील सर्वात लहान २० देशांत सामील आहे. या देशाचे क्षेत्रफळ जवळपास ७२५.७ किमी आहे. लोकसंख्या किमान ५६.४ लाख आहे. या देशाच्या मुख्यतः ४ अधिकारीक भाषा आहेत- इंग्रजी, चायनीज, मलय आणि तामिळ. सिंगापूरमध्ये तुम्हाला सर्वत्र उंचच-उंच इमारती पहावयास मिळतील, परंतु या देशात एक सर्वात उंच इमारत आहे, जिचे नाव 'गुओको टॉवर' (Guoco Tower) आहे. जी २९० मी. उंच आहे. या देशात एक हायवे बनवला गेला आहे, जो ३००० कि.मी. चा आहे. हा हायवे सिंगापूरला थेट हॉंगकॉंगशी जोडतो. सिंगापूर देशाची सुंदरताच इतकी आहे की, जवळ-...
Comments
Post a Comment