Posts

Showing posts from October, 2020

झोपल्यानंतर स्वप्ने का पडतात?

Image
  झोपल्यानंतर स्वप्ने का पडतात?         स्वप्नांची दुनिया ही एक वेगळी आणि विचित्र संकल्पना आहे. मानवाचा मेंदू हा त्याच्या इच्छापूर्तींसाठी नेहमीच सक्रिय असतो, परंतु ज्या इच्छा नेहमीच अपूर्ण राहिलेल्या असतात, त्या कुठेतरी पूर्ण व्हाव्यात म्हणून त्या इच्छा स्वप्नाचे रूप घेतात. असे म्हटले जाते की, स्वप्ने ही मानवाच्या अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण करतात. सर्वच स्वप्न ही पूर्ण होऊ शकत नसतात, परंतु या इच्छा स्वप्नांचे रूप घेऊन आपल्याला मानसिक संतुष्टी आणि तृप्ती देतात. स्वप्न म्हणजे काय..? याचे उत्तर असे देता येणार नाही. झोपलेल्या अवस्थेत आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स (Neurons) सामान्यापेक्षा अधिक सक्रिय होतात. आपण झोपल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असे जाणवते की, आपल्या बाजूला कोणीतरी उभे आहे किंवा आपल्यासोबत काहीतरी भयानक होते आहे. काही जणांना झोपेत बोलायची किंवा चालायची सवय असते, काहींना एखादा आवडीचा पदार्थ स्वप्नात दिसतो व ते तो पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात, स्वप्नात दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, परंतु असे काहीही ते करू शकत नाही. काहीवेळा झोपेत ...

झोपल्यानंतर घडत असणाऱ्या गोष्टी..

Image
झोपल्यानंतर घडत असणाऱ्या गोष्टी..          जेव्हा आपण झोपतो आणि पूर्ण झोप झाल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा झोपेत आणि झोपल्यानंतर अश्या काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात. कारण, या सर्वच गोष्टी आपल्या शरीराशी निगडित असतात. • शरीर दुर्बल होणे (Sleep Paralysed) काही दुर्बल (Paralysed) लोकं असतात, जे स्वतः एका जागेहून दुसऱ्या जागी हालचाल करू शकत नाहीत, परंतु आपण सामान्य असलो, तरी आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपण तेवढ्या वेळेपुरता दुर्बल (Paralysed) होतो. आपले शरीर बधिर झालेले असते आणि अश्या स्थितीत साधा स्पर्शही झालेला आपल्याला जाणवत नसतो. आपल्या शरीराचे तापमान ही किंचित वाढलेले असते. कारण, झोपेत आपली काहीही हालचाल नसते, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह अगदी शिथिल झालेला असतो आणि शरीरातील उष्णता वाढते. आपल्याला ऐकू देखील येत नसते. ही काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती सर्वांसोबत होत असते. झोपल्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नसते. कारण, आपण पूर्ण गाढ झोपेत असतो. • डोळ्यांची हालचाल- आपल्याला असे वाटत असते की, आप...

आरोग्यदायी जीवनाचा मंत्र: (शांत झोप)

Image
आरोग्यदायी जीवनाचा मंत्र: (शांत झोप) आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगली झोप असणे, हे देखील खूप महत्वाचे आहे. चांगल्या दर्जाची झोप तुमचे जीवन बदलून टाकते. आपल्या शरीराला चांगल्या दर्जाची झोप मिळाल्यामुळे आपल्या मेंदूची शक्ती ही वाढते आणि आपल्या शरीरातील मेद कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराला किमान ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते. चांगली झोप असल्यामुळे आपल्या विचारांची प्रक्रिया जलद होते, आपण आपले काम ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही, तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटायला लागतात, परिणामी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे आपली झोप अगदी कमी ही नसावी आणि जास्त ही नसावी. चांगल्या झोपेसाठी झोपेच्या वेळा देखील पाळल्या गेल्या पाहिजेत. आपण स्वतःच्या झोपेची एक जीवनशैली तयार केली पाहिजे. • शांत झोपेसाठी एक चांगली जीवनशैली:- • शांत झोप येण्यासाठी जेवण हे झोपेच्या किमान १ ते १.३० तास आधी असायला हवे. कारण, जेवल्यानंतर तुम्ही लगेच अर्ध्या तासात जर झोपलात, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर काहीवेळातच आपली पचनक्रिया सुरू होते ...

एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते..

Image
  एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते.. आयुष्यात चुका कोणाकडून होत नाहीत? सगळ्यांकडूनच होतात.. काहीदा माफी मागितलीही जाते परंतु कधी कधी आपण ती मागायची ही विसरून जातो. कधी नकळत होणाऱ्या चुका आपल्याकडून नकळतपणे घडून जातात की, ज्या आपल्या मनात देखील नसतात. अशा चुकांकडे आपले सहजपणाने दुर्लक्ष होते, आपण जाणूनबुजून दुर्लक्षित करतो देखील, परंतु ज्या चुकांबद्दल आपण क्षमेस पात्र असणारही नाही, अशा चुकांना कधीही विश्वासाने 'चूक' म्हणता येणार नाही. अशा चुका 'गुन्ह्यास' पात्र ठरतात. परंतु जाणून-बुजून ज्या चुका केल्या जातात तो गुन्हा असतो. ज्या घडतात त्या चुका आणि जो केला जातो तो गुन्हा. चुका या माफीस पात्र असतात, परंतु सतत त्याच चुका जाणूनबुजून करणं याला चूक म्हणता येणार नाही, तो अक्षम्य गुन्हाच असतो जो सर्वांकडून निष्काळजीपणाने केला जातो. अपराध घडलाच, तर तो माफक नसतो आणि चूक घडली, तर ती माफक असते. कधी कळत-नकळतपणे आपल्याकडूनही घडलेल्या लहान-सहान चुकांची माफी मागणं यात काहीही गैर नाही. तो आपला मोठेपणा.. आणि समोरच्याने माफ करणं, हा त्याचा आपलेपणा.. एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते.. ✍️...