Posts

Showing posts from December, 2020

Goodbye 2020..

Image
Goodbye 2020 ..          गुडबाय २०२०.. कित्ती सोप्पं असतं ना, एखाद्या वर्षाला गुडबाय म्हणणं.. तसं म्हणावं तर लागणारंच. कारण, आपण सर्वजण पुढच्या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कदाचित, हे पुढचे नवीन वर्ष आपल्याला खूप काही देऊन जाईल आणि हे तरी वर्ष चांगलं असेल, या आशेने आपण पुढच्या वर्षात प्रवेश करतो खरं.. परंतु, तेही वर्ष आपल्या मनासारखं गेलं नाही की, पुन्हा त्या वर्षाला वाईट म्हणून बसतो. मग पुन्हा पुढच्या नवीन वर्षाचे वेध लागतात. असे चक्र दरवर्षी चालूच असते.          या २०२० च्या सुरुवातीलाच सर्व काही सुरळीतपणे चालू होते. मग नंतर कोण जाणे? कुठला व्हायरस आला आणि सर्वच बिघडू लागले. लोकं आजारी पडली. याचा इलाज नसल्यामुळे कितीतरी नुकसान झाले. परिणामी, देशात लॉकडाऊन करावे लागले. याबद्दल, लोकांच्या मनात दहशती निर्माण झाल्या की, आता काय होणार? पूर्ण वर्ष बर्बाद होणार.. शाळा, कॉलेज, नोकऱ्या, कामधंदे यांना तात्पुरते बंद करण्यात आले. यातंच लोकं चिंतीत झाले. लोकांचे बाहेर पडणे, एकत्र येणे देखील बंद झाले. परंतु, त्यातही उगीच बाहेर फिरणाऱ्या लोका...

अस्सल नाशिकची मिसळ..

Image
अस्सल नाशिकची मिसळ..          हिवाळा.. थंड वातावरण..आणि त्यात गरमागरम तर्रीदार मिसळ..आणि त्यात मिसळ जर नाशिकची असेल तर.. वाह! क्या बात है.. म्हणजे खरंतर मिसळ हे खाद्य नाशिकचंच आहे हे जगजाहिर जरी असले, तरी नाशिकच्या मिसळची चव ही नाशिक सोडून दुसरीकडे कुठेही नाही. नाशिक..आणि मिसळीचं नातं नाशिककरांच्या रक्तातंच आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मिसळीचे सच्चे प्रेमी आहेत. जर नाशिकमध्ये राहूनही कोणाला मिसळ आवडत नसेल , तर ते मुळात नाशिककर नाहीतंच.. आणि नाशिकमध्ये येऊन कोणी मिसळ एकदा जरी खाऊन पाहिली, तर ते नाशिकचे सच्चे आशिक झालेच म्हणून समजा... नाशिकमध्ये कोणाला मिसळ आवडत नाही, असे कोणीही नाही. अस्सल मिसळीची मजा घ्यायची, तर ती नाशिकमध्येच..          मिसळीची सुरुवातंच मूळ नाशिकमध्ये झाली , असे म्हणावयांस काही हरकत नाही. मिसळ जेव्हा सुरू झाली, तेव्हा ती चुलीवर तयार केली जायची. त्यानंतरही, मिसळीत व मिसळीच्या चवीतही अनेक प्रकारचे बदल घडून आले. मिसळीसोबत आजकाल अनेक प्रकार येतात. परंतु, अस्सल नाशिकची मिसळ म्हणजे गरमागरम वाफवलेली मऊ आण...

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण:- स्वित्झर्लंड

Image
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण:- स्वित्झर्लंड          जर या पृथ्वीवर स्वर्गासारखेच एखादे ठिकाण असेल, तर ते म्हणजे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आणि ज्या ठिकाणी प्रत्येकजण एकदा तरी जाण्यास इच्छुक असतो. बऱ्याच लोकांचे ड्रीम डेस्टिनेशन (Dream Destination) असलेले ठिकाण म्हणजेच 'स्वित्झर्लंड' (Switzerland). ज्या ठिकाणचे चॉकलेट्स, चविष्ट पदार्थ आणि नैसर्गिक सुंदरता अर्थातच तुम्हाला स्वतःहून बोलावते. परंतु, असे काय आहे या देशामध्ये की, जो देश संपूर्ण जगभरातील लोकांचे आकर्षण बनलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, तुमच्या आवडीचे ठिकाण, स्वित्झर्लंड... स्वित्झर्लंड हे जगभरातील लोकांचे आकर्षण का बनले असेल? नैसर्गिक सुंदरता..? फक्त इतकेच नव्हे, तर स्वित्झर्लंड हे बऱ्याच बाबतीत बऱ्याच देशांमध्ये पुढे आहे. ● प्रस्तावना (Introduction)- स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडातील एक सुंदर देश आहे, ज्या देशाची लोकसंख्या जवळपास ८५.०४ लाख आहे. स्वित्झर्लंडची राजधानी असलेले 'बर्न' (Bern) शहर हे एक असे शहर आहे की, ज्या शहराने आपले ऐतिहासिक कौशल्य जपून ठेवलेले आहे. या देशातील लोकसंख्य...