Posts

Showing posts from November, 2020

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

Image
जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई           जगातील एक असे शहर जेथे ठिकठिकाणी श्रीमंत लोकं राहतात. जेथे श्रीमंत होण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते, ते शहर म्हणजे 'दुबई' (Dubai).. ज्या शहराची मुख्यतः ओळखच भरपूर पैसे, श्रीमंती, सुपरकार्स (Super Cars), ऐशो-आरामाने भरलेले जीवन आणि व्यवसाय हे आहे. या शहरात व्यवसाय तर आहेतंच, शिवाय या व्यतिरिक्त संपूर्ण जगातील हे एक असे एकमात्र शहर आहे, जेथील लोकं असा विचार करतात की, कोणतीही वस्तू ही जास्तीत-जास्त महागात कशा प्रकारे खरेदी केली जाईल? दुबई हे एक सुंदर शहर तर आहेच.. तसेच, याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एकदा तरी या शहराला भेट द्याल... ● प्रस्तावना (Introduction)- दुबई म्हणजे भरपूर पैसा, ऐशो-आरामचे जीवन, मौज-मजा, मोठमोठ्या इमारती, महागड्या चारचाकी गाड्या, कॅसिनो, रेस्तराँ, वाळवंट, समुद्र आणि भरपूर काही.. दुबई या शहराबद्दल बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, दुबई हा एक देश आहे. दुबई हा कोणताही देश नसून हे एक शहर आहे, जे यु.ए.ई. (U.A.E.) म्हणजेच, युनायटेड अरब अमिरात (United Arab Emirates) मधील ७ अमिरातींपैकी एक आहे. जगात...

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया

Image
कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया         जगातील सर्वात मोठा महाद्वीप हा आशिया आहे. ज्यामध्ये, आपला भारत देशही सामील आहे. आज आपण अशा देशाची माहिती घेणार आहोत, जो देश देखील आशियामध्येच वसलेला आहे. आपल्या भारताप्रमाणेच या देशात देखील सणवार हे वर्षभर साजरे केले जातात. या देशात जास्त खर्च न करताही एखादा पर्यटक एका सुंदर पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. समुद्र, रात्रजीवन (Night Life), वन्यजीवन (Wild Life) तसेच, निसर्गाने भरलेला हा देश आपली सुंदरता, कलाकारी व संस्कृतीमुळे जगभरातील पर्यटकांसाठी सर्वात प्रसिद्ध असा देश आहे. आपण जाणून घेत आहोत, दक्षिण-पूर्व आशिया खंडात स्थित अत्यंत आकर्षक व सुंदर देश 'मलेशिया' बद्दल.. तुम्हीही जर या देशाला भेट देण्याचा विचार करीत असाल, तर नक्कीच.. या देशात तुमचे स्वागत आहे, परंतु त्या आधी आपण या देशाबद्दलची माहिती घेऊयात... ● प्रस्तावना (Introduction)- 'मलेशिया' (Malaysia) हा देश दक्षिण-चीन समुद्रापासून पूर्व आणि पश्चिम मलेशिया अशा दोन भागांत विभागला गेलेला आहे. या संपूर्ण देशात एकूण १३ राज्य आहेत. मलेशियाची राष्ट्रीय राजधानी 'कुआलालंपुर...

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

Image
जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर         आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत, जो जगातील सर्वात सुंदर देश आहे. हा देश इतका स्वच्छताप्रिय आहे की, कोणीही आश्चर्यचकित होईल. जेथे आश्चर्यकारक गोष्टीही अनेक आहेत. आपण जाणून घेत आहोत, आशियातील सर्वात विकसित देश म्हणजेच, 'सिंगापूर' बद्दल... सोबतच, आपण हे देखील जाणून घेणार आहोत की, या देशातील फिरण्याची प्रसिद्ध ठिकाणे, प्रसिद्ध खाद्य-पदार्थ तसेच, या देशाबद्दलच्या अशाच अनेक रोचक गोष्टी. ● प्रस्तावना (Introduction)- 'सिंगापूर' हा देश जगातील सर्वात लहान २० देशांत सामील आहे. या देशाचे क्षेत्रफळ जवळपास ७२५.७ किमी आहे. लोकसंख्या किमान ५६.४ लाख आहे. या देशाच्या मुख्यतः ४ अधिकारीक भाषा आहेत- इंग्रजी, चायनीज, मलय आणि तामिळ. सिंगापूरमध्ये तुम्हाला सर्वत्र उंचच-उंच इमारती पहावयास मिळतील, परंतु या देशात एक सर्वात उंच इमारत आहे, जिचे नाव 'गुओको टॉवर' (Guoco Tower) आहे. जी २९० मी. उंच आहे. या देशात एक हायवे बनवला गेला आहे, जो ३००० कि.मी. चा आहे. हा हायवे सिंगापूरला थेट हॉंगकॉंगशी जोडतो. सिंगापूर देशाची सुंदरताच इतकी आहे की, जवळ-...

सबसे बढ़कर मेरा देश: भारत

Image
  सबसे बढ़कर मेरा देश: भारत         जगातील विविध ठिकाणांबद्दलची माहिती जाणून घ्यावयास कोणाला नाही आवडणार..? प्रत्येकालाच निरनिराळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असते. आपण भारतीय असून भारतात राहतो, तर आपल्याच देशाबद्दलची माहिती आपल्याला असायलाच हवी. खरं तर, आपला देश हा खूप महान आणि महाकाय देश आहे. म्हणूनच, आपल्या देशाची माहिती ही त्याप्रमाणेच विशाल आहे. चला तर मग, जाणून घेऊयात आपल्या देशाची गाथा.. • भारतीय भाषा- आपण कोणत्याही प्रदेशात गेलो, तरीही त्या प्रदेशांतील नवनवीन भाषांची अडचण ही प्रत्येकालाच येत असते. बऱ्यांच देशात जास्तीत-जास्त फक्त २ ते ३ भाषा बोलल्या जातात, तर संपूर्ण जगात एकूण ८ हजार भाषांचे प्रयोग केले जातात. परंतु, आपल्या देशात स्वतःच्याच एकूण '१६००' भाषा आहेत. या १६०० भाषांमधून १२२ भाषा या प्रमुख भाषा म्हणून मानल्या गेलेल्या आहेत. ज्यातून ३० भाषांचा प्रयोग येथील कमीत-कमी १० लाख लोकं तर करतातंच. आपण हे ऐकून नक्कीच हैराण होऊ की, भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात, तरीही भारताची स्वतःची अशी एकही राष्ट्रीय भाषा नाही. बऱ्यांच लोकांना असे वाटते की, 'हिंदी' हीच आ...