कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया


कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया




        जगातील सर्वात मोठा महाद्वीप हा आशिया आहे. ज्यामध्ये, आपला भारत देशही सामील आहे. आज आपण अशा देशाची माहिती घेणार आहोत, जो देश देखील आशियामध्येच वसलेला आहे. आपल्या भारताप्रमाणेच या देशात देखील सणवार हे वर्षभर साजरे केले जातात. या देशात जास्त खर्च न करताही एखादा पर्यटक एका सुंदर पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. समुद्र, रात्रजीवन (Night Life), वन्यजीवन (Wild Life) तसेच, निसर्गाने भरलेला हा देश आपली सुंदरता, कलाकारी व संस्कृतीमुळे जगभरातील पर्यटकांसाठी सर्वात प्रसिद्ध असा देश आहे. आपण जाणून घेत आहोत, दक्षिण-पूर्व आशिया खंडात स्थित अत्यंत आकर्षक व सुंदर देश 'मलेशिया' बद्दल.. तुम्हीही जर या देशाला भेट देण्याचा विचार करीत असाल, तर नक्कीच.. या देशात तुमचे स्वागत आहे, परंतु त्या आधी आपण या देशाबद्दलची माहिती घेऊयात...


● प्रस्तावना (Introduction)-

'मलेशिया' (Malaysia) हा देश दक्षिण-चीन समुद्रापासून पूर्व आणि पश्चिम मलेशिया अशा दोन भागांत विभागला गेलेला आहे. या संपूर्ण देशात एकूण १३ राज्य आहेत. मलेशियाची राष्ट्रीय राजधानी 'कुआलालंपुर' (Kuala Lumpur) असून, हे या देशातील सर्वात मोठे शहर आहे. तसेच, या देशात भारतीय, चिनी, मलय आणि विभिन्न जातींचे लोकं समाविष्ट आहेत. मलेशियाची अधिकारीक भाषा ही 'मलय' आहे, परंतु येथे शिक्षण व आर्थिक क्षेत्रात इंग्रजी भाषेचा वापर करतात. तसेच, या देशात १३० पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत.


● आर्थिक स्थिती (Economical Condition)-

मलेशिया हा देश अत्यंत श्रीमंत देश आहे. परंतु, सन १९७० च्या आधी हा देश इतका श्रीमंत नव्हता. त्यावेळी, येथील आर्थिक स्थिती कृषी व्यवसायावर अवलंबून होती. सन १९८० नंतर या देशात मोठे परिवर्तन घडून आले आणि या देशाची आर्थिक स्थिती अधिक वेगाने पुढे गेली. या देशात आर्थिक स्थितीने वेग घेता-घेता ही स्थिती इथपर्यंत येऊन पोहोचली की, मलेशिया हा देश सिंगापूर देशानंतर दक्षिण-आशियातील सर्वात अधिक श्रीमंत देश आहे. येथे फिरायला येण्याकरिता तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. या देशात मलेशियाचे चलन म्हणजेच 'मलेशियन रिंगीट' (Malaysian Ringgit) ज्याची किंमत आहे १ रिंगीट म्हणजे भारतीय रुपयांत '१८.०१ रुपये'.


● विशेषता (Specialities)-
या देशात तुम्हाला अधिक प्रमाणात भारतीय लोकं देखील दिसतील. या देशातील समाज भारताप्रमाणेच धार्मिक आहे.
मलेशिया या देशात सर्वात जास्त संख्या ही भारतीय लोकांची आहे. त्यामुळे, मलेशियाची सभ्यता ही अगदी भारताप्रमाणेच आहे. या देशात आपल्या देशाप्रमाणेच संस्कृती जपली जाते. तसेच, येथे उत्सव साजरा करण्याचा उत्साह देखील येथील नागरिकांमध्ये पहावयास मिळतो.

मलेशियातील लोकं पाहुणचार करण्यास अधिक प्रिय असतात. तसेच, ही लोकं पर्यटकांची मदत करण्याकरिता सदैव तत्पर असतात. या देशात यात्रा करणेही अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे, पर्यटकांना फिरण्यासाठी हे एक आदर्श स्थळ आहे.

मलेशियामध्ये जवळ-जवळ १४ हजार ५०० जातींच्या वनस्पती आहेत. तसेच, येथील बेलम जंगलात (Belum Forest) सर्वात जास्त वाघ पहावयास मिळतात. या जंगलात तुम्हाला प्रत्येक कि.मी. वर एक तरी वाघ पहावयास मिळेल.


या देशात अतिशय स्वच्छता असल्यामुळे येथील वातावरण व हवा देखील निर्जंतुक असते. त्यामुळे, येथील लोकांना श्वासासंबंधित कोणताही रोग होत नाही. तसेच, या देशाला नैसर्गिक सुंदरतेचे प्रतीक मानले जाते.

मलेशियाचा 'पेनांग पूल' (Penang Bridge) हा आशिया खंडातील तिसरा सर्वात मोठा पूल आहे. हा सर्वात मोठा पूल जवळ-जवळ १३.७ कि.मी. लांबीचा आहे. तसेच, या देशात सर्वात जास्त हायवे देखील आहेत.



● खाद्यपदार्थ (Food)-

मलेशिया या देशात स्ट्रीट फूड फेस्टिवल (Street Food Festival) देखील असतो. या ठिकाणचे स्ट्रीट फूड (Street Food) हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय असतात. जर तुम्ही देखील स्ट्रीट फूडचे शौकीन असाल, तर येथे आल्यानंतर 'जालन अलोर' (Jalan Alor) या ठिकाणास नक्की भेट द्या. येथे तुम्हाला मलेशियन, थाई चायनीज तसेच, विविध प्रकारच्या स्ट्रीट फूड्सची चव घेता येईल.


● खरेदी (Shopping)-

जर तुम्हाला शॉपिंगची भरपूर आवड असेल, तर मलेशियात आकर्षक शॉपिंग मॉल्स आहेत. येथे स्थानिकपासून तर आंतरराष्ट्रीय प्रतीच्या वस्तू देखील योग्य किमतींवर उपलब्ध आहेत. जेथे तुम्ही तुमच्या आवडीच्या व मनपसंत गोष्टी जरूर खरेदी करू शकता.



मलेशियात फिरण्याची ठिकाणे (Sight Seeing Points) :


१. कुआलालंपुर (Kuala Lumpur):


मलेशियाची राजधानी असलेले 'कुआलालंपुर' (Kuala Lumpur) शहर हे तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ, गगनचुंबी इमारती तसेच, शॉपिंग मॉल्स सोबतच नाईट लाईफचा आनंद देते. हे शहर आधुनिकतेप्रमाणेच ऐतिहासिक गोष्टींनी देखील जुळले गेलेले आहे. येथील उंचच-उंच गगनचुंबी इमारती पर्यटकांसाठीचे आकर्षण आहे. या शहरात सर्वात मोठे टॉवर म्हणजे 'पेट्रोनास ट्वीन टॉवर' (Petronas Twin Tower) आहे. तुम्ही येथील 'सुलतान अब्दुल समद' बिल्डिंगचा अद्भुत नजराणा पाहू शकता. तसेच, हिंदू मंदिर 'बटू गुफा' (Batu Caves) याचे दर्शन देखील घेऊ शकता. सोबतच, तुम्ही जर चॉकलेटचे चाहते असाल, तर येथील विविध चॉकलेट्सचे स्वाद देखील घेऊ शकता.


२. पेनांग हिल (Penang Hill)-


मलेशिया देशातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे 'पेनांग हिल' (Penang Hill). हे ठिकाण पर्यटकांच्या सर्वात प्रमुख आकर्षणातील एक आहे. अत्यंत सुंदर अशा पेनांग हिलस्टेशनला 'स्नेक टेम्पल' (Snek Temple), 'केक लॉक-सी मंदिर' (Kek Lok Si Temple) येथे तुम्ही भेट देऊ शकता. पेनांगची काही गावं ही जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच, पेनांगला खाद्यपदार्थसाठी पृथ्वीवरचा स्वर्ग देखील म्हटले जाते.


३. माउंट किनाबालू (Mount Kinabalu)-


दक्षिण-आशियातील सर्वात उंच शिखराचे नाव 'माउंट किनाबालू' (Mount Kinabalu) आहे. या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची जवळ-जवळ १३ हजार ४३५ फूट आहे. तसेच, हे शिखर ७५४ चौ.कि.मी. पर्यंत पसरलेले आहे. हे शिखर पर्यटकांसाठी अतिशय आवडीचे तसेच, प्रसिद्ध देखील आहे. माउंट किनाबालू हे सर्वात जास्त ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असणारे स्थळ आहे. हे ठिकाण जैवविविधता व नैसर्गिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त आहे. जेथे तुम्हाला अनेक प्रकारच्या विविध जाती-प्रजातींचे प्राणी व पक्षी पहावयास मिळतील. येथे जाण्याची एक खासियत म्हणजे, या ठिकाणी येण्याकरिता सर्वात आधी तुमच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तुम्ही या शिखराची चढाई करण्यासाठी सक्षम आहात की नाही, प्रथम हे पडताळले जाते. यासाठी, तुम्ही तंदुरुस्त असणे गरजेचे असते. कारण, यासाठी तुम्हाला कोणतेही साहित्य पुरविले जाते नाही. परंतु, येथे तुम्हाला एक गाईड दिला जातो.


४. कॅमेरॉन हायलँड्स (Cameron Highlands)-


'कॅमेरॉन हायलँड्स' (Cameron Highlands) हे मलेशियातील सर्वात सुंदर ठिकाणातील एक आहे. येथे तुम्हाला भरपूर चहाच्या बागा पहावयास मिळतील. हे ठिकाण सर्वाधिक चहा उत्पादनासाठी ओळखले जाते. येथील चहाची चव म्हणजे खूपच अप्रतिम.. जेव्हा तुम्ही येथे भेट द्याल, तेव्हा येथील चहाची चव नक्कीच घ्या.


५. मलक्का (Malacca)-


मलेशियातील आणखी एका सुंदर स्थळांपैकी 'मलक्का' (Malacca) हे स्थळ ओळखले जाते. मलक्कातील हरित जीवन तसेच, समुद्रतट हे पर्यटकांना आकर्षित करतात. मलक्का येथे तुम्हाला ऐतिहासिक इमारती देखील पहावयास मिळतात. येथे अतिशय अप्रतिम व खूप सुंदर ठिकाणे देखील समाविष्ट आहेत.


६. सारवाक चेंबर (Sarawak Chamber)-


मलेशिया या देशात जगातील सर्वात मोठी गुहा आहे, जिचे नाव 'सारवाक चेंबर' (Sarawak Chamber) आहे. जर तुम्हालाही गुहा पहावयाची आवड असेल, तर या गुहेला नक्कीच भेट द्या.



        मलेशिया.. एक दक्षिण-आशियातील सर्वात सुंदर आणि आकर्षित देश, जो आपल्या कर्तृत्वाने अत्यंत पुढे निघून गेलेला आहे आणि काळानुरूप या देशात अफाट प्रगती देखील घडून आली. भारताप्रमाणेच या देशात देखील हिंदू-धर्मीय लोकं आहेत. त्यामुळे, या देशात आपल्या देशाप्रमाणेच संस्कृतीची जोपासना होते. अत्यंत स्वच्छताप्रिय तसेच, पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारा मलेशिया हा देश खरंच खूप सुंदर आहे. जीवनात एकदा तरी अशा देशाला भेट जरूर द्या...


✍️प्रणिता अशोक फडणीस
© ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर