जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई


जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई


          जगातील एक असे शहर जेथे ठिकठिकाणी श्रीमंत लोकं राहतात. जेथे श्रीमंत होण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते, ते शहर म्हणजे 'दुबई' (Dubai).. ज्या शहराची मुख्यतः ओळखच भरपूर पैसे, श्रीमंती, सुपरकार्स (Super Cars), ऐशो-आरामाने भरलेले जीवन आणि व्यवसाय हे आहे. या शहरात व्यवसाय तर आहेतंच, शिवाय या व्यतिरिक्त संपूर्ण जगातील हे एक असे एकमात्र शहर आहे, जेथील लोकं असा विचार करतात की, कोणतीही वस्तू ही जास्तीत-जास्त महागात कशा प्रकारे खरेदी केली जाईल? दुबई हे एक सुंदर शहर तर आहेच.. तसेच, याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एकदा तरी या शहराला भेट द्याल...



प्रस्तावना (Introduction)-

दुबई म्हणजे भरपूर पैसा, ऐशो-आरामचे जीवन, मौज-मजा, मोठमोठ्या इमारती, महागड्या चारचाकी गाड्या, कॅसिनो, रेस्तराँ, वाळवंट, समुद्र आणि भरपूर काही..

दुबई या शहराबद्दल बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, दुबई हा एक देश आहे. दुबई हा कोणताही देश नसून हे एक शहर आहे, जे यु.ए.ई. (U.A.E.) म्हणजेच, युनायटेड अरब अमिरात (United Arab Emirates) मधील ७ अमिरातींपैकी एक आहे. जगातील सर्वच देशांपेक्षा जलद गतीने सर्वात जास्त विकसित होणारे शहर म्हणजे दुबई..


दुबई या शहरातील लोकांना अमिराती असे म्हटले जाते. परंतु, एक गोष्ट अशी की, या शहरात अमिराती लोकांची संख्या फक्त १५ टक्के आहे आणि बाकी लोकसंख्या ही ५१ टक्के भारत, १६ टक्के पाकिस्तान, ८ टक्के बांगलादेश आणि ३ टक्के फिलिपिन्स मधून आहे. भारतीय पर्यटकांना दुबई फिरण्याची खूप आवड असते. राज्याप्रमाणे, कॅनडा या देशांतर दुबई हे असे शहर आहे की, जेथे भारतीय लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. दुबई हे असे शहर आहे की, येथे येण्याकरिता तुम्हाला जगातील कोणत्याही मोठ्या शहरातून विमाने मिळतील.


विशेषता (Specialities)-

दुबई या शहरातील लोकं इतके श्रीमंत असतात की, या शहरात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींकडे किमान २ चारचाकी गाड्या असतात, त्या देखील जगातील सर्वात महागड्या गाड्या असतात. येथील पोलिसांकडे देखील फरारी (Ferrari), लँबोरगिनी (Lamborghini) यांसारख्या वेगवान सुपरकार्स (Super Cars) असतात, ज्यांचा वेग खूप जास्त असतो. तसेच, यांच्याकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गाड्या देखील आहेत. इतकेच नाही तर, येथे स्मार्ट पोलीस स्टेशन्स देखील आहेत, जेथे कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. येथे गुन्हेगारी ० टक्के आहे. तसेच, दुबईचे विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.



खाद्यपदार्थ (Food)-

दुबई या शहरात तुम्हाला कधीही व कुठेही जेवणाची अडचण होणार नाही. कारण, येथे तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण व खाद्यपदार्थ देखील मिळतात. येथे जगातील अनेक प्रकारचे विविध खाद्यपदार्थ तुम्हाला पहावयास मिळतील. तसेच, येथे भारतीय पदार्थ देखील खूप सहजपणे मिळतात.


कायदे व नियम (Laws & Rules)-

दुबई हे सर्वात सुंदर आणि अत्यंत स्वच्छता असणारे शहर आहे. येथे गुन्हेगारी अगदीच ० टक्के असल्यामुळे येथे पोलीस कमी आणि ठिकठिकाणी फक्त कॅमेरेच लावलेले आहेत. तसेच, या शहरात वाहतुकीचे कायदे आणि नियमही खूप कठोर आहेत. जर तुम्ही चुकून येथील सिग्नल तोडलात, तर तुम्हाला भक्कम दंड तर भरावा लागतोच शिवाय, न्यायालयीन कोठडी देखील होते.


आर्थिक स्थिती (Economics)-

तुम्हाला असा प्रश्न तर नक्कीच पडला असेल की, दुबई हे शहर इतके श्रीमंत शहर कसे? कुठून आला असेल दुबईकडे इतका पैसा..?

खरं तर, दुबई या शहराकडे २० वर्षांच्या आधी वाळवंटाशिवाय दुसरे काहीही नव्हते. परंतु, आज दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत आणि विविध पर्यटनस्थळे आहेत. अनेक लोकांना असे वाटते की, दुबईकडे तेलाचे खूप मोठे भांडार आहे की, ज्यामुळे दुबई हे शहर इतके श्रीमंत बनू शकले आहे. परंतु, असे काहीही नाही. दुबईला तेलापासून मिळणारे उत्पन्न हे फक्त ७ टक्केच आहे. बाकी सर्व उत्पन्न हे रिअल इस्टेट (Real Estate), एअरलाईन्स (Airlines) तसेच, बाहेरच्या देशांमधून लावण्यात आलेली कंपनी आणि त्यामधून केल्या जाणाऱ्या भक्कम गुंतवणुकीतून होते. त्याचप्रमाणे, दुबईचे सर्वात जास्त उत्पन्न हे पर्यटनातून देखील होते.


सोन्याचे शहर (Golden City)-

दुबईला 'सोन्याचे शहर' (Golden City) असे म्हटले जाते. येथील लोकं सोने परिधान करणे इतके पसंत करतात की, येथे सोन्याची अत्यंत भरमार आहे. तसेच, येथील लोकांची वाहने देखील सोन्याची असतात. या गाड्या देखील कोणत्याही साध्या-सुध्या गाड्या नसून जगातील सर्वांत महागड्या गाड्या तुम्हाला ठिकठिकाणी पहावयास मिळतील.

सोन्याचा व्यापार हा दुबईमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर होतो. येथे सोन्याची जवळ-जवळ ३०० दुकाने आहेत आणि या दुकानात नेहमीच कमीत-कमी १० टन इतके सोने उपलब्ध असते. या शहरात सोन्याचे एटीएम (Gold ATM) देखील आहे, ज्यातून सोने मिळते. हे पहिले असे एटीएम आहे की, ज्यातून २४ कॅरेट सोन्याची बिस्कीटे, सोन्याची नाणी (Golden Coins) आणि दागिन्यांसोबतच ३२० प्रकारच्या विविध गोष्टी मिळतात.




● दुबईमध्ये फिरण्याची ठिकाणे (Sight Seeing Places):


१. बुर्ज खलिफा (Burj Khalifa)-

दुबईमध्ये सर्वात पहिले स्थान हे 'बुर्ज खलिफा' (Burj Khalifa) आहे. कारण, बुर्ज खलिफा हे दुबईची शान आहे. २०१० या साली ही इमारत बनण्याच्या सोबतच, ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीतून तुम्हाला संपूर्ण दुबईचा अनोखा नजराणा दिसेल. ही इमारत १ हजार ९२१ फूट इतकी उंच आहे आणि या इमारतीला एकूण १६३ मजले आहेत. या इमारतीत जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. तसेच, ही इमारत इतकी उंच आहे की, या इमारतीला ९० कि.मी. दूरवरून देखील सहजपणे पाहिले जाऊ शकते.


२. वाळवंटी सफारी (Dessert Safari)-

दुबई हे एक वाळवंटात वसलेले शहर आहे. येथील सफारी अत्यंत रोमांचक सफारी असते. तुम्ही येथे वेगाने गाडी चालवण्याचा आनंद ही घेऊ शकता. येथे विविध खाद्यपदार्थ, चहा-कॉफी तसेच, येथील प्रमुख नृत्य 'बेली डान्स' (Belly Dance), उंटावरून सफारी आणि अशा भरपूर गोष्टींचा आनंद घेऊ शकता. वाळवंटात सूर्यास्ताचा नजराणा देखील अतिशय अप्रतिम असतो. म्हणूनच, विविध देशांतील पर्यटकांचे हे खास आकर्षण आहे.


३. दुबई मॉल (Dubai Mall)

सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा 'दुबई मॉल' (Dubai Mall) हा जगातील सर्वात मोठा मॉल आहे. तुम्हाला येथे भरपूर गोष्टी पहावयास मिळतात. जर तुम्हाला हा मॉल पूर्ण फिरायचा असेल, तर यामध्येही तुम्हाला पूर्ण २ दिवस लागतात. यासोबतच, दुबई मॉलमध्ये जगातील सर्वात मोठे मत्स्यालय (Aquarium) देखील आहे. जेथे समुद्रात राहणाऱ्या जवळ-जवळ ३३ हजार जलचरांना ठेवले आहे. हे मत्स्यालय देखील खूप सुंदर आणि आश्चर्यजनक आहे.


४. पाम द्वीप (Palm Island)-

'पाम द्वीप' (Palm Island) हे एक असे द्वीप आहे की, जेथे लोकांची घरे, राहण्याची ठिकाणे, मोठमोठी रिसॉर्ट्स आहेत. हे द्वीप 'ताड' (Palm Tree) वृक्षाच्या आकृतीवरून बांधले गेले आहे.

हा तीन द्विपांचा समूह आहे- १) पाम जुमराह (Palm Jumeirah) २) पाम जेबेल अली (Palm Jebel Ali) ३) पाम डेरा (Palm Deira).

बर्लिनची भिंत (Berlin Wall) आणि चीनची भिंत (The Great Wall of China) यानंतर, आता पाम द्वीप (Palm Island) हे जगातील सर्वात आश्चर्यकारक नमुन्यातील एक आहे. हे द्वीप अंतराळातून देखील पाहिले जाऊ शकते. म्हणूनच, लोकं या द्वीपला जगातील ८ वे आश्चर्य देखील मानतात.



५. चमत्कारिक बाग (Miracle Garden)-

दूर-दूरपर्यंत वाळवंटात पसरलेली एक अद्भुत बाग म्हणजेच 'चमत्कारिक बाग' (Miracle Garden)... ही बाग कोणालाही अत्यंत आश्चर्यचकित करून ठेवणारी आहे. संपूर्ण जगातील सुंदर-सुंदर फुलांना दुबईच्या या बागेत अनेक विविध आकृतींसोबत लावले गेलेले आहेत. या बागेत १० हजारांपेक्षाही जास्त फुलांच्या विविध प्रजातींचा समावेश आहे. इतकेच नाही, तर या बागेला फुलांनी सजविले गेले आहे. येथील नद्या, घरे, महाल इ. सर्वच फुलांनी सजविण्यात आले आहे. येथील तलाव तर या बागेला खूपच अप्रतिम शोभा देतो.



         दुबई हे शहर खूपच श्रीमंत शहर आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही की, हे शहर फक्त अरबपतींसाठीचेच शहर आहे. येथे सर्वच वर्गातील लोकांना स्थान आहे. येथे सर्वांसाठीच काही ना काहीतरी आहे. म्हणूनच, जगभरातील पर्यटक हे दुबईकडे आकर्षित होतात. दुबई हे खूप सुंदर शहर आहे. जेव्हा तुम्हीही या अनोख्या शहराला भेट द्याल, तेव्हा हे शहर तुम्हाला नक्कीच काही ना काही देऊन जाईल.


✍️प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया