जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर
जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर
आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत, जो जगातील सर्वात सुंदर देश आहे. हा देश इतका स्वच्छताप्रिय आहे की, कोणीही आश्चर्यचकित होईल. जेथे आश्चर्यकारक गोष्टीही अनेक आहेत. आपण जाणून घेत आहोत, आशियातील सर्वात विकसित देश म्हणजेच, 'सिंगापूर' बद्दल...
सोबतच, आपण हे देखील जाणून घेणार आहोत की, या देशातील फिरण्याची प्रसिद्ध ठिकाणे, प्रसिद्ध खाद्य-पदार्थ तसेच, या देशाबद्दलच्या अशाच अनेक रोचक गोष्टी.
● प्रस्तावना (Introduction)-
'सिंगापूर' हा देश जगातील सर्वात लहान २० देशांत सामील आहे. या देशाचे क्षेत्रफळ जवळपास ७२५.७ किमी आहे. लोकसंख्या किमान ५६.४ लाख आहे. या देशाच्या मुख्यतः ४ अधिकारीक भाषा आहेत- इंग्रजी, चायनीज, मलय आणि तामिळ.
सिंगापूरमध्ये तुम्हाला सर्वत्र उंचच-उंच इमारती पहावयास मिळतील, परंतु या देशात एक सर्वात उंच इमारत आहे, जिचे नाव 'गुओको टॉवर' (Guoco Tower) आहे. जी २९० मी. उंच आहे. या देशात एक हायवे बनवला गेला आहे, जो ३००० कि.मी. चा आहे. हा हायवे सिंगापूरला थेट हॉंगकॉंगशी जोडतो.
सिंगापूर देशाची सुंदरताच इतकी आहे की, जवळ-जवळ १ कोटीपेक्षाही अधिक पर्यटक या देशात फिरावयास येतात. या देशातील लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकं या देशाला फक्त भेट देण्यासाठी येतात. तसेच, येथे भारतीय लोकांचेही प्रमाण आहे. त्यामुळे, येथील शॉपिंग मॉल्समध्ये भारतीय वस्तू देखील सहजपणे मिळतात.
● विशेषता-
सिंगापूर हा देश लहान देश आहे, परंतु या देशातील सर्वच लोकं खूप शिक्षित आहेत. या देशातील साक्षरता दर पूर्ण १०० टक्के आहे. येथे तुम्हाला कोणीही अशिक्षित व्यक्ती सापडणार नाही. सिंगापूर या देशाची गोष्टच निराळी आहे. कारण, या देशाची सफाई म्हणजे सर्वात उच्च दर्जाची आहे.
या देशात रस्ते आणि उंचच-उंच गगनचुंबी इमारती तुमचे मन नक्कीच जिंकतील. येथील झाडे-झुडुपे व वनस्पतींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. तसेच, या झाडांना विशिष्ट असा आकारही देण्यात येतो, जो येथील पर्यटकांसाठी आकर्षण ठरवणारा असतो.
या देशातील लोकांचे आरोग्य खूप स्वस्थ असते. तसेच, या देशात तुम्हाला पायी चालणारे लोकंच खूप दिसतील. येथे जास्तीत-जास्त सायकलचा वापर करणारे लोकं पहावयास मिळतात.
● कायदे व नियम (Laws and Rules)-
सिंगापूर या देशात स्वच्छताच इतकी आहे की, या देशाला भेट दिल्यानंतर तुम्हाला कुठेही कागदाचा एक तुकडाही रस्त्यावर सापडणार नाही. तसेच, तुम्ही या देशात आल्यानंतर कुठेही कचरा फेकू शकत नाही. जर असे झालेच, तर तुम्हाला १ हजार सिंगापूर डॉलर्सचा दंड (भारतीय रुपयांत ५४ हजार १७८ रुपये) आणि २ महिन्यांची न्यायालयीन कोठडी होऊ शकते. या देशात कोणीही च्युइंगम खाऊ शकत नाही. कारण, येथील सरकारची मान्यता आहे की, एक तर च्युइंगम चघळल्यामुळे १०० प्रकारचे आजार होतात आणि दुसरीकडे लोकं चघळलेले च्युइंगम बेपरवाईने रस्त्यावर फेकतात. या देशातील स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात घेऊन या देशात सरकारने च्युइंगम न विकण्याचा निर्णय घेतला. तसेच या देशात सिगारेट ओढण्यासही बंदी आहे.
सिंगापूर या देशात पूर्णतः ० टक्के गुन्हेगारी आहे. तुम्ही तुमची बॅग एअरपोर्टवर जरी सोडून आलात, तरीही तुमच्या बॅगला कोणीही हात लावणार नाही. तसेच, या देशात कोणीही अंमली पदार्थांची विक्री करताना आढळून आले, तर थेट फाशीची शिक्षा आहे.
● खाद्यपदार्थ (Food)-
सिंगापूरमध्ये दही हे सर्वात प्रसिद्ध आहे. या देशातील लोकं रोज किमान ४ ते ५ लिटर ताक पितात. त्यामुळे, येथील लोकांचे आरोग्य हे अधिकच स्वस्थ असते.
सिंगापूरमध्ये एक ठिकाण असे आहे, ज्याचे नाव आहे 'चायना टाऊन' (China Town). जेथे तुम्हाला सर्वच प्रकारचे मिश्रित पदार्थ मिळतात. येथील चायना टाऊनमध्ये जवळ-जवळ २६० मिश्रित पदार्थांचे स्टॉल्स आहेत. तसेच येथे तुम्हाला भारतीय पदार्थ देखील मिळतात.
सिंगापूरमध्ये दर जुलै महिन्यात फुड फेस्टिव्हल देखील आयोजित केला जातो. येथे मॅक डोनाल्ड (Mc Donald), पिझ्झा हट (Pizza Hut), KFC, सब वे (Sub Way), बर्गर किंग (Burger King) तसेच, तुम्हाला यांसारखी अनेक आंतरराष्ट्रीय पदार्थांची दुकाने सापडतील.
● नाईट लाईफ (Night Life)-
सिंगापूरची 'Night Life' म्हणजे अनोखीच. जणू काही रात्रीच्या संपूर्ण काळोखातील आकाशात फक्त टिमटीमणारे तारे.. या देशात रात्री कोणीही झोपत नाही. कारण, रात्री सुद्धा लोकं येथे फिरायला येतात. त्यामुळे, या देशात तुम्हाला कधीही एकटं वाटणार नाही. सिंगापूरमधील नाईट क्लब (Night Club) ज्याचे नाव आहे, 'मार्क्यु सिंगापूर' (Marquee Singapour). जो जगभरातील सर्वात अनोखा आणि सर्वात शानदार नाईट क्लब (Night Club) मधील एक आहे.
१. बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden)-
सिंगापूरमधील बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden) हे जवळपास १५८ वर्षे जुने आहे. येथील सुंदर अशा फुलांच्या बागेला भेट दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच असे वाटेल की, सिंगापूरला प्रकृतीचे वरदान मिळालेले आहे. ही बाग जवळपास ५२ हेक्टर परिसरामध्ये पसरलेली आहे.
२. वॉटर पार्क आणि क्रूझ ट्रिप (Water Park and Cruise Trip)-
तुम्ही येथे क्रूझ ट्रीपचा (Cruise Trip) आनंद देखील घेऊ शकता. तसेच, वॉटर पार्क मध्ये जाऊन मजा करायला कोणाला आवडत नसेल? तुम्हालाही आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत 'पंग गोल' (Punggol) वॉटर पार्कला नक्की भेट द्या.
३. नैसर्गिक गुहा (Nature Cave)
सिंगापूर येथील 'नैसर्गिक गुहा' (Nature Cave) अधिकच सुंदर आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल, तर या स्थळाला नक्की भेट द्या. तसेच, येथे आल्यानंतर तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.
४. सिंगापूर पूल (Singapour Flyover)-
सिंगापूरचा पूल हा सिंगापूरचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण, जर तुम्हाला पूर्ण सिंगापूर उंचावरून पहावयाची संधी मिळत असेल तर..? हा पूल असा आहे की, ज्या ठिकाणाहून तुम्ही सूर्यास्त अगदी डोळे भरून पाहू शकता आणि सिंगापूरच्या पूर्ण अप्रतिम दृश्याचा सर्वात उंचावरून लाभ घेऊ शकता.
५. सिंगापूरचा सर्वात मोठा पाळणा (Giant Wheel)-
सिंगापूरचा पाळणा हा आशिया खंडातील सर्वात मोठा पाळणा आहे, ज्याची उंची १५६ मी. आहे. या पाळण्यामधून तुम्हाला मलेशिया व इंडोनेशियातील काही भागही पहावयास मिळतात. यामधून तुम्ही पूर्ण सिंगापूरचे दृश्य मन भरून पाहू शकता.
६. सिंगापूरचे प्राणिसंग्रहालय (Singapour Zoo)-
सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालय ही एक पारिवारिक सहल आहे. येथे विविध प्राण्यांच्या सर्वात सुंदर आणि विशिष्ट प्रकारच्या प्रजाती संग्रहित केल्या गेलेल्या आहेत. या प्राणिसंग्रहालयात जवळ-जवळ ३०० पेक्षाही अधिक प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. तसेच, येथे अशाच अनेक आकर्षक गोष्टी आहेत. जसे की, प्राणिसंग्रहालयाची विशेष सफारी, विविध प्राण्यांचे संग्रह तसेच, विविध अन्न-पदार्थांचे स्टॉल्स इ. देखील यात समाविष्ट आहेत.
अशाच अनेक गोष्टी सिंगापूरला अत्यंत आकर्षक बनवून टाकतात. तसेच, सुंदर-सुंदर रस्ते, उंचच-उंच इमारती, आकर्षक शॉपिंग मॉल्स, निसर्ग आणि अनोखी नाईट लाईफ (Night Life) तसेच, येथील आकर्षक लाईफ स्टाईल (Lifestyle) या देशाच्या सुंदरतेला अजूनच वाढवते.
✍️ प्रणिता अशोक फडणीस
© ALL RIGHTS RESERVED











Comments
Post a Comment