सबसे बढ़कर मेरा देश: भारत

 

सबसे बढ़कर मेरा देश: भारत



       जगातील विविध ठिकाणांबद्दलची माहिती जाणून घ्यावयास कोणाला नाही आवडणार..? प्रत्येकालाच निरनिराळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असते. आपण भारतीय असून भारतात राहतो, तर आपल्याच देशाबद्दलची माहिती आपल्याला असायलाच हवी. खरं तर, आपला देश हा खूप महान आणि महाकाय देश आहे. म्हणूनच, आपल्या देशाची माहिती ही त्याप्रमाणेच विशाल आहे. चला तर मग, जाणून घेऊयात आपल्या देशाची गाथा..


• भारतीय भाषा-


आपण कोणत्याही प्रदेशात गेलो, तरीही त्या प्रदेशांतील नवनवीन भाषांची अडचण ही प्रत्येकालाच येत असते. बऱ्यांच देशात जास्तीत-जास्त फक्त २ ते ३ भाषा बोलल्या जातात, तर संपूर्ण जगात एकूण ८ हजार भाषांचे प्रयोग केले जातात. परंतु, आपल्या देशात स्वतःच्याच एकूण '१६००' भाषा आहेत. या १६०० भाषांमधून १२२ भाषा या प्रमुख भाषा म्हणून मानल्या गेलेल्या आहेत. ज्यातून ३० भाषांचा प्रयोग येथील कमीत-कमी १० लाख लोकं तर करतातंच. आपण हे ऐकून नक्कीच हैराण होऊ की, भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात, तरीही भारताची स्वतःची अशी एकही राष्ट्रीय भाषा नाही. बऱ्यांच लोकांना असे वाटते की, 'हिंदी' हीच आपली राष्ट्रीय भाषा आहे, परंतु हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा नसून ती आपल्या देशाची फक्त अधिकृत भाषा (Official Language) आहे.


• हत्यारांबाबत सक्रिय-


आपल्या देशाला इतके महान का म्हटले जात असेल..?
याची बरीच उत्तरे मिळतील. परंतु, एक गोष्ट अशी आहे, जी आपल्या देशाला इतर देशांपेक्षा अजूनच विशेष बनवते. आपला देश हा अगदी सुरुवातीपासूनच खूप शांततेत राहणे पसंत करतो. भारताने कधीही सत्तेसाठी, स्वार्थासाठी स्वतःहुन कोणत्याही देशावर हमले केलेले नाहीत. तसेच आपला देश हा कधीही संकट स्वतःहून ओढावून घेत नाही, परंतु भारताच्या इतिहासात आपल्या देशावर खूप हमले झाले, संबंधित देशांनी आपल्या देशाला खूप त्रास दिला, आपल्या देशावर सत्ता गाजवली, युद्धे, आक्रमण, अत्याचार झाले. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आपल्या देशातील लोकं हा अन्याय सहन करतील. त्यात ही आपल्या देशातील वीर-जवानांनी देखील याला तोडीस-तोड उत्तरे दिली. आज आपला देश हा हत्यारांबाबत खूप सक्रिय आहे आणि हीच गोष्ट आपल्या देशाला अगदी विशेष बनवणारी आहे.


• नामांकित देश-


भारत हा असा देश आहे की, आज भारताकडे सर्वात मोठे लोकतंत्र आहे, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि भारतात जगातील दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे. भारतात खूप जास्त लोकसंख्या असल्यामुळे रेल्वेचे जाळे देखील मोठे आहे. म्हणूनच, भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था आहे. तसेच अमेरिकेनंतर भारतीय रेल्वे ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने वैद्यकीय क्षेत्रातही अफाट प्रगती केली आहे. आयुर्वेद, पंचकर्म इ. सर्वच भारतात विकसित झालेले आहे.



• क्रीडा विशेष-


'भारत' म्हटले, तर क्रिकेटचे शौकीन सर्वच भारतीय आहेत, शिवाय 'कबड्डी' हा खेळ भारतीय खेळ असल्यामुळे सर्वच ६ विश्वचषक हे भारतानेच जिंकलेले आहेत, ही भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशात सर्वात मोठे क्रिकेटचे क्रीडांगण (Stadium) आहे. जे गुजरातमधील अहमदाबाद येथील 'मोटेरा' (Motera) क्रीडांगण, ज्याचे नाव 'सरदार पटेल क्रीडांगण' असे आहे. या क्रीडांगणात जवळ-जवळ १ लाख लोकं एकत्र बसून क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात. आज जगभरात खेळला जाणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ आणि सापशिडी या खेळांचा शोध देखील भारततंच लावला गेला आहे.



• निरनिराळे पदार्थ-

आपण भारतीय खूपच जास्त खवय्ये असतो. म्हणूनच तर, भारतीय जेवणाची चव ही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच जगभरातील लोकं भारतात फक्त भारतीय जेवणाचा स्वाद घेण्यासाठीच येतात. आता पंजाबचा पनीर टिक्का असो, गुजरातचा फाफडा असो, तामिळनाडूचा इडली-डोसा असो किंवा महाराष्ट्रातील झणझणीत भरीत-भाकरी.. या सर्वच गोष्टींचे लोकं जगभरात शौकीन आहेत. तसेच भारतात जास्तीत-जास्त लोकं हे शाकाहारी आहेत. त्यामुळे भारतात लोकांचे आरोग्यही तितकेच स्वस्थ आहे.





• शैक्षणिक प्रगती-


जगातील इतर देशांप्रमाणेच भारत हा शिक्षणामध्ये देखील झपाट्याने प्रगती करत आहे. या देशात पूर्ण जगभरातील मोठी मॉंटेसरी शाळा आहे, जी आहे उत्तर प्रदेशातील 'लखनौ' येथील 'City Montessori School'. ही शाळा 'गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये सामील असून, तेथील विद्यार्थ्यांची संख्या ही जवळ-जवळ २६ हजार आहे.



• अनोखे पोस्ट ऑफिस-


पूर्ण जगभरात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस असतील, तर ते फक्त आपल्याच देशात.. भारतात जवळपास १ लाख ५५ हजार पोस्ट ऑफिस आहेत. पूर्ण देशात आपण कुठेही गेलो, तरीही आपल्याला तेथे पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बॉक्स नक्कीच पहावयास मिळतील. तसे म्हणायला गेले, तर 'भारतीय डाक' हे बरेच जुने झालेले असले, तरीही याशिवाय कोणतीही सरकारी कामे होत नाहीत. भारतीय डाक ची एक खासियत अशी की, आपण गावात आणि शहरात तर भरपूर पोस्ट ऑफिस बघितले असतील, परंतु कधी पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस पाहिले आहे? हे पोस्ट ऑफिस भारतातीलच जम्मू आणि काश्मीरमधील 'दलझिल' (Dal Jhil) वर तरंगणारे हे अनोखे पोस्ट ऑफिस आहे.


• विज्ञान आणि तंत्रज्ञानात विकसित-


बाकी सर्व गोष्टींमध्ये तर आपला देश हा आघाडीवर आहेच, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानात ही भारत निरनिराळे शोध व नवकल्पना करीत असतो. 'रोबोटिक्स' क्षेत्रात ही भारत मागे नाही. असेच अनेक रोबोट हे भारताने बनविले, परंतु एक रोबोट अशा प्रकारे बनवला की, जो व्यक्तींशी अत्यंत हुशारीने बोलतो. भारतात विज्ञानामुळे देखील टप्प्या-टप्प्यांवर प्रगती होत गेली. आपल्या देशातील 'इसरो' संस्था (ISRO), ज्या संस्थेबद्दल आपण भारतीय अत्यंत गर्वाने म्हणू शकतो की, आपला देश हा अंतरिक्षातील कार्यक्रमांत ५ देशांमध्ये सहभागी आहे. यामध्ये भारतातील इसरोचे मंगळयानही समाविष्ट आहे आणि जगात भारत हा असा पहिला देश आहे की, ज्याने पहिल्याच सुफळ प्रयत्नांत मंगळयानास मंगलग्रहावर पाठविले. इतकेच नाही, तर चंद्रावर सर्वात प्रथम पाणी शोधण्याचे कार्य ही भारतानेच केले. तसेच भारत हा अंतरिक्षात मानवी रोबोट (यंत्र मानव) पाठविण्याचे कार्य ही करत आहे.




• विविध कौशल्यात प्राविण्य-


भारताबद्दल अजून एक खासियत सांगायची झाली, तर भारत हा देश 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स' मध्ये सामील असणारा जगात तिसरा देश आहे. याचे उदाहरण म्हणजे, एका दुचाकीवर ५८ जणांचा भार पेलवणे, एका हाताने एकाच मिनिटात १०० नारळं फोडणे, तसेच सर्वात मोठी मिशी असणारा माणूस, अर्थातंच भरपूर विशेष कौशल्य व कला या भारतात उपजत आहेत. भारताच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. जसे की, जगातील सर्वात उंच मूर्ती (Statue of Unity), जगातील सर्वात मोठी पक्ष्याची प्रतिकृती (Bird Statue). ही केरळमधील 'कोल्लम' जिल्ह्यातील 'जटायू' ची प्रतिमा आहे, जी संपूर्ण १५ हजार Sq ft. मध्ये पसरलेली आहे.





• जगभरातील उत्पादन-


भारतात सर्वात जास्त मसाल्याचे उत्पादन होते. भारतातून जवळ-जवळ ७० टक्के मसाल्याची निर्यात इतर देशांत केली जाते. भारतात फळांमध्ये केळींचे ही उत्पादन सर्वात जास्त होते. आपण भारतीय चहाचे खूप मोठे चाहते आहोत. आपली सकाळ ही रोज एक कप चहानेच होत असते. चहाचे ही उत्पादन जास्तीत-जास्त भारतातूनच होते. भारतात चहाच्या चाहत्यांना आसाम, उटी आणि दार्जिलिंगमधील चहांच्या बागांबद्दल आणखी वेगळे काय सांगणार..?


     असा आपला भारत, सर्वच देशांपेक्षा अनोखा.. आपल्या देशाची गाथाच इतकी आहे की, जी शब्दांत मांडणे अत्यंत कठीण आहे. भारत खूप सुंदर आणि अनोखा तर आहेच, शिवाय सर्वधर्म-समभाव देखील आपल्या देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे, आपल्या देशाबद्दल आपल्याला अभिमान हा असायलाच हवा.

म्हणूनच तर, मेरा भारत महान..
सारे जहां से अच्छा.. हिंदोस्ताॅं हमारा..


✍️प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया