एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते..

 

एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते..




आयुष्यात चुका कोणाकडून होत नाहीत? सगळ्यांकडूनच होतात..

काहीदा माफी मागितलीही जाते परंतु कधी कधी आपण ती मागायची ही विसरून जातो. कधी नकळत होणाऱ्या चुका आपल्याकडून नकळतपणे घडून जातात की, ज्या आपल्या मनात देखील नसतात. अशा चुकांकडे आपले सहजपणाने दुर्लक्ष होते, आपण जाणूनबुजून दुर्लक्षित करतो देखील, परंतु ज्या चुकांबद्दल आपण क्षमेस पात्र असणारही नाही, अशा चुकांना कधीही विश्वासाने 'चूक' म्हणता येणार नाही. अशा चुका 'गुन्ह्यास' पात्र ठरतात.

परंतु जाणून-बुजून ज्या चुका केल्या जातात तो गुन्हा असतो. ज्या घडतात त्या चुका आणि जो केला जातो तो गुन्हा. चुका या माफीस पात्र असतात, परंतु सतत त्याच चुका जाणूनबुजून करणं याला चूक म्हणता येणार नाही, तो अक्षम्य गुन्हाच असतो जो सर्वांकडून निष्काळजीपणाने केला जातो. अपराध घडलाच, तर तो माफक नसतो आणि चूक घडली, तर ती माफक असते.

कधी कळत-नकळतपणे आपल्याकडूनही घडलेल्या लहान-सहान चुकांची माफी मागणं यात काहीही गैर नाही. तो आपला मोठेपणा.. आणि समोरच्याने माफ करणं, हा त्याचा आपलेपणा..

एक माफी देखील तुमची वेळ बदलू शकते..

✍️ प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया