जगभरातील पर्यटकांचे आकर्षण:- स्वित्झर्लंड


जगभरातील पर्यटकांचे आकर्षण:- स्वित्झर्लंड



         जर या पृथ्वीवर स्वर्गासारखेच एखादे ठिकाण असेल, तर ते म्हणजे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आणि ज्या ठिकाणी प्रत्येकजण एकदा तरी जाण्यास इच्छुक असतो. बऱ्याच लोकांचे ड्रीम डेस्टिनेशन (Dream Destination) असलेले ठिकाण म्हणजेच 'स्वित्झर्लंड' (Switzerland). ज्या ठिकाणचे चॉकलेट्स, चविष्ट पदार्थ आणि नैसर्गिक सुंदरता अर्थातच तुम्हाला स्वतःहून बोलावते. परंतु, असे काय आहे या देशामध्ये की, जो देश संपूर्ण जगभरातील लोकांचे आकर्षण बनलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, तुमच्या आवडीचे ठिकाण, स्वित्झर्लंड...

स्वित्झर्लंड हे जगभरातील लोकांचे आकर्षण का बनले असेल? नैसर्गिक सुंदरता..? फक्त इतकेच नव्हे, तर स्वित्झर्लंड हे बऱ्याच बाबतीत बऱ्याच देशांमध्ये पुढे आहे.


प्रस्तावना (Introduction)-

स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडातील एक सुंदर देश आहे, ज्या देशाची लोकसंख्या जवळपास ८५.०४ लाख आहे. स्वित्झर्लंडची राजधानी असलेले 'बर्न' (Bern) शहर हे एक असे शहर आहे की, ज्या शहराने आपले ऐतिहासिक कौशल्य जपून ठेवलेले आहे. या देशातील लोकसंख्येपेक्षा येथील विदेशी लोकांचीच संख्या जवळपास २३ टक्के आहे. या देशातील लोकांचा जीवनस्तर तसेच, राहणीमान हे अन्य देशांपेक्षा सर्वात उच्चस्तरिय आहे.


विशेषता (Specialities)-

स्वित्झर्लंड या देशात सर्वत्र बर्फच-बर्फ जमलेला असतो. आसपास फक्त पर्वत, असंख्य झाडे, हिरवळ, बर्फाळ प्रदेश हेच स्वित्झर्लंडचे मुख्य आकर्षण आहे. या देशात ३१०० मीलपेक्षाही अधिक रेल्वे आहेत. येथील लोकं देखील जास्तीत-जास्त रेल्वेनेच प्रवास करतात. या देशात जगातील सर्वात उच्च दर्जाच्या घड्याळांची निर्मिती केली जाते. तसेच, ही घड्याळे संपूर्ण जगभरात देखील प्रसिद्ध आहेत. येथे १ कोटींपेक्षा जास्त लोकं फक्त स्वित्झर्लंड फिरायला येतात. यामुळेच, हा देश पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच, येथे सर्वात जास्त सुट्ट्या देखील शिक्षकांनाच असतात.


खाद्यपदार्थ (Food)-

स्वित्झर्लंड हा देश चॉकलेटसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोणत्याही देशात जर शितपेयाचा (Cold Drink) वापर केला जात असेल, तर तो फक्त स्वित्झर्लंड मध्येच.. तुम्हाला या देशात जेवणाची फारशी अडचण येणार नाही. कारण, येथे तुम्हाला तुमच्या आवडीचे खाद्य-पदार्थ देखील मिळतात.



अर्थकारण (Economics)-

स्वित्झर्लंड हा देश अत्यंत श्रीमंत देश तर आहेच, शिवाय युरोपमधील याच देशात पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे, या देशाची सर्वाधिक कमाई ही पर्यटनातून होते. स्वित्झर्लंड हा देश तसा आकाराने लहान असून, हा देश सर्वात स्थिर आणि आपल्या अर्थव्यवस्थेत ही प्रगती करतो आहे. येथील चलन (Currency) म्हणजे 'स्विस फ्रँक' (Swiss Franc) आहे आणि १ स्विस फ्रँक म्हणजे आजच्या तारखेला भारतीय रुपयांत ८१ रुपये आहेत. स्वित्झर्लंडमध्ये बँका तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. या देशात बँकांची भरमार आहे. तसेच, या देशाच्या बँकांमध्ये जगभरातील तमाम बँकांचे देखील पैसे समाविष्ट आहेत आणि ते सुद्धा इतके जास्त की, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. येथील बँकांची संख्या इतकी जास्त आहे की, प्रत्येक १४०० नागरिकांकरिता एक बँक आहे. या देशात शिक्षकांना सर्वात जास्त पगार मिळतो. म्हणजेच, भारतीय रुपयांत जवळ-जवळ ५० लाख रुपये.


कायदे, नियम व सुरक्षा (Laws, Rules & Security)-

स्वित्झर्लंड या देशात अपराध जवळ-जवळ ० टक्के आहे. या देशात मद्यविक्री ही फक्त रात्री १० वाजेपर्यंतच केली जाते. खरे सांगायचे झाले, तर या देशाला सैन्यदलाची गरज नाही. कारण, हा देश मुळातंच जगातील सर्वांत शांत देशांमधील एक आहे. येथील सरकार, कायदे, नियम व सुरक्षा देखील अत्यंत कडक आहे. या देशात भ्रष्टाचार तसेच, लाच देणे-घेणे इ. गोष्टींवर बंदी आहे. या देशात अगदी कुठेही पर्यटकांच्या सुख-सोयीची सर्वात जास्त काळजी घेतली जाते. स्वित्झर्लंडच्या सरकारने येथील प्रत्येक नागरिकांकरिता 'अणूविरहित आश्रय' (Bomb Shelter) बनविलेले आहे. हा एक अशा प्रकारचा आश्रय आहे, जेथे कोणत्याही प्रकारच्या बॉम्बचा किंवा अण्वस्त्रांचा परिणाम होत नाही. त्यामुळे, जर कधी या देशावर परमाणूचे हत्यार चालविले गेले, तर या देशातील सर्वच नागरिक अगदी सुरक्षित राहतील.


निसर्ग (Nature)-

स्वित्झर्लंड या देशात नैसर्गिक सुंदरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. येथे निसर्ग हा प्रत्येक ऋतूत अगदी विविध रंग दर्शवितो. स्वित्झर्लंडमध्ये एका बाजूला बर्फांचे डोंगर तसेच, दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ पहावयास मिळते. विविध प्रकारच्या सुंदर-सुंदर फुलांनी नटलेले हे सौंदर्य अगदी खरोखरंच मनाला भुरळ पाडते. या देशाचा ६० टक्के भाग हा 'आल्प्स पर्वताने' (Alps Mountain) व्यापलेला आहे. येथील हिमनद्या व झाडे ही वर्षातील ७-८ महिने फक्त बर्फातंच गुंडाळलेली असतात.


फिरण्याची ठिकाणे (Sight Seeing Places)-


माउंट टिटलीस (Mount Titlis)-

जर तुम्हाला बर्फांचे डोंगर पहावयाची आवड असेल, तर 'माउंट तितलीस' (Mount Titlis) हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला 'रोप-वे' चा (Rope Way) आनंद घेण्याची संधी देखील मिळेल. जो तुम्हाला फक्त येथीलच दृश्ये दाखवणार नाही, तर येथून तुम्हाला जर्मनीतील 'ब्लॅक फॉरेस्टचा' (Black Forest) नजराणा देखील पहावयास मिळतो. येथे तुम्हाला 'ऍडव्हेंचर' (Adventure) करण्याचा आनंदही घेता येतो.

ज्युरीख शहर (Zurich City)-

स्वित्झर्लंडमधील 'ज्युरीख' (Zurich City) या शहराची तर गोष्टच निराळी आहे. या शहरात बऱ्याच ठिकाणी विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत. या शहरातील 'प्राणिसंग्रहालय' (Zoological Garden) हे पाहण्यासारखे आहे. येथील विविध प्राणी व पक्ष्यांमुळे या संग्रहालयाची गणती ही जगातील सर्वांत उच्चस्तरिय प्राणिसंग्रहालयात केली जाते. हे शहर सर्वात आधुनिक (Fashionable) शहर आहे. येथील मोठमोठी शॉपिंग मॉल्स तसेच, विविध प्रकारची नाविन्यता, रीती, पद्धती, पेहराव इ. गोष्टी या पर्यटकांसाठी खूप आकर्षित करणाऱ्या आहेत. हे शहर 'ज्युरीख तलावा'साठी (Zurich Lake) देखील प्रसिद्ध आहे.


अनोखा धबधबा (Rhine Falls)-

स्वित्झर्लंड हा देश या 'अनोख्या धबधब्या'साठी (Rhine Falls) देखील प्रसिद्ध आहे. स्वित्झर्लंडमधील 'Rhine' नदी ही एक धबधबा निर्माण करते, ज्याचा एक खूप सुंदर असा धबधबा तयार होतो, ज्याला 'Rhine Fall' असे म्हटले जाते. हा धबधबा अत्यंत सुंदर आहे. तसेच, या धबधब्याचे दृश्य देखील अत्यंत मनमोहक असे आहे.


जंगफ्रौ (Jungfrau)-

'जंगफ्रौ' (Jungfrau) ही युरोपची सर्वात उंच पर्वत श्रुंखला आहे. येथे सर्वात उंच स्थानावर युरोपचे रेल्वेस्थानक देखील आहे. उंचावरून सफर करणाऱ्या रेल्वेमधून तुम्ही जंगफ्रौच्या सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही येथे 'आइस स्किइंग'ची (Ice Skiing) मजा घेऊ शकता. येथे लोकांची वस्ती नसल्यामुळे येथील नैसर्गिक नजराणा अतिशय सुरेख आहे.


बर्न (Bern)-

स्वित्झर्लंडची राजधानी असलेले 'बर्न' (bern) हे शहर खूपच सुंदर आहे. हे शहर स्वित्झर्लंडमधील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे दुसरे शहर आहे. या शहरात नैसर्गिक दृश्ये तर नाहीत, परंतु या शहराला सर्वात जुने शहर असण्याचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. येथे तुम्हाला रेस्तराँ, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आणि बऱ्याच ऐतिहासिक इमारती पहावयास मिळतील.



मॅटरहॉर्न (Matterhorn)-

जर तुम्ही रोमांचक खेळांचे शौकीन असाल, तर 'मॅटरहॉर्न' (Matterhorn) हे स्थान तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही 'ख़तरों के खिलाड़ी' असाल आणि अगदी जवळून बर्फीय नजराणा पाहू इच्छित असाल, तर हे स्थान उत्तम आहे. येथे युरोपचे सर्वात मोठे 'आइस स्किइंग विभाग' (Ice Skiing Zones) देखील आहे.


ग्रोटो ग्लेशिअर (Grotto Glacier)-

स्वित्झर्लंड मधील 'ग्रोटो ग्लेशिअर' (Grotto Glacier) येथे पाहण्याकरिता अतिशय रोमांचकारी दृश्ये आहेत. येथे मोठमोठ्या बर्फांच्या गुहा आहेत. या गुहांच्या भिंतींवर जवळपास ८ हजार ४५० दिवे (Lamps) झळकतात. तसेच, हि दृश्ये खूपच रोमांचकारी अनुभव देतात.


शिलथोर्न ग्लेशिअर (Schilthorn Glacier)-

'शिलथोर्न ग्लेशिअर' (Schilthorn Glacier) हे जगभरातील सर्वात सुंदर पर्वतश्रेणींपैकी एक आहे. येथील 'पाईन ग्लोरिया' (Pine Gloria) नामक फेरीने तुम्ही येथील संपूर्ण दृश्यांचा लाभ घेऊ शकता. येथील बर्फाळ पर्वताची अतिशय सुंदर दृश्ये ही कॅमेरात कैद करून ठेवण्यासारखी आहेत.



         स्वित्झर्लंडच्या याच अप्रतिम सुंदरतेमुळे हा देश पर्यटकांसाठी खऱ्या अर्थाने स्वर्गच बनलेला आहे. जर तुम्ही खरोखरीचे निसर्गप्रेमी असाल, तर तुमच्यासाठी स्वित्झर्लंडपेक्षा दुसरा आणखी कोणताही देश नाही. या देशात निसर्गच नाही, तर अशाही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या अत्यंत आश्चर्यजनक आणि पाहण्यासारख्या आहेत. एकदा तरी तुम्ही या देशाला भेट जरूर द्या...


✍️प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया